Slack साठी Tjaz बद्दल मदत
आम्हाला लिहा
help@tjaz.com वर ईमेल करा, किंवा tjaz.com वरील “मदत आणि अभिप्राय” वापरा (खात्याची गरज नाही). आम्ही 2 कामकाजाच्या दिवसांत उत्तर देतो.
Tjaz ला लिहाप्रश्न आणि उत्तरे
मी क्विझ कशी पाठवू?
tjaz.com वर क्विझ उघडा आणि “Slack वर पाठवा” दाबा.
कोणीतरी मला क्विझ पाठवली आहे
Slack मध्ये Apps खाली Tjaz उघडा आणि एखादे उत्तर किंवा “क्विझ सोडवा” टॅप करा. मेसेजमध्ये लिहिलेले असते की क्विझ कोणी पाठवली आणि त्यांना काय दिसेल.
मला क्विझ नको आहेत
Slack मध्ये Tjaz उघडा, Home वर जा आणि “मला क्विझ पाठवू नका” दाबा.
मी Tjaz कसे काढू?
Tools & settings → Manage apps → Installed Apps → Tjaz → App Details → Configuration → Remove App. आम्ही 14 कामकाजाच्या दिवसांत वर्कस्पेसचा डेटा हटवतो.
आमच्या Slack मध्ये ॲप्सना ॲडमिनची मंजुरी लागते
“Request to install” दाबा. ॲडमिनने Tjaz ला मंजुरी दिल्यावर पुन्हा “Slack वर पाठवा” दाबा.
अरबी, फारसी किंवा हिब्रू भाषेतील क्विझ नीट दिसत नाही
Slack उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणाऱ्या भाषांना सपोर्ट करत नाही. त्यामुळे ती क्विझ tjaz.com वर सोडवा.
काही अडचण आल्यास
तुम्ही Slack मध्ये नकार दिला
Slack मध्ये काहीही जोडले गेले नाही. तुम्हाला हवे तेव्हा पुन्हा प्रयत्न करा.
तुमच्या Slack ॲडमिनच्या मंजुरीची प्रतीक्षा
तुमच्या वर्कस्पेसमध्ये नवीन ॲप्सना ॲडमिनची मंजुरी लागते. Slack मध्ये “Request to install” दाबा. ॲडमिनने Tjaz ला मंजुरी दिल्यावर पुन्हा “Slack वर पाठवा” दाबा. तुमची क्विझ जशीच्या तशी आहे.
आणखी एका ॲपसाठी जागा नाही
विनामूल्य Slack मध्ये मोजकीच ॲप्स जोडता येतात. Tjaz जोडण्यापूर्वी ॲडमिनला एखादे ॲप काढावे लागेल.
Slack आणि Tjaz जोडले गेले नाहीत
Slack आणि Tjaz यांच्यात काहीतरी चुकले. कृपया पुन्हा प्रयत्न करा. असे वारंवार होत असल्यास आम्हाला लिहा.
Slack 16 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या लोकांसाठी आहे
Slack मध्ये Tjaz वापरण्यासाठी “माझे वय किमान 16 वर्षे आहे” वर खूण करा, कारण Slack 16 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या लोकांसाठी आहे.
आधी अटी स्वीकारा
Slack ने लॉग इन करण्यासाठी तुम्ही अटी स्वीकारत आहात यावर खूण करा.
प्रायव्हेट चॅनेल यादीत दिसत नाही
Tjaz ज्या प्रायव्हेट चॅनेलमध्ये आहे तेच त्याला दिसते. त्या चॅनेलमध्ये /invite @tjaz लिहा, म्हणजे चॅनेलमध्ये कोण आहे ते Tjaz ला दिसेल.
यूजर ग्रुप दिसत नाहीत
यूजर ग्रुप फक्त Slack च्या सशुल्क प्लॅनमध्ये असतात, आणि Tjaz जोडताना त्याला ते पाहण्याची परवानगी दिली असेल तरच दिसतात.
कोणाला तरी क्विझ मिळाली नाही
ज्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत क्विझ पोहोचू शकली नाही ती व्यक्ती आणि त्याचे कारण Tjaz दाखवते, उदा. खाते निष्क्रिय केलेले, दुसऱ्या संस्थेतील व्यक्ती किंवा वर्कस्पेसच्या नियमांमुळे अडवलेले. त्यामुळे कोणीही नकळत यादीतून गायब होत नाही.
Tjaz वर तुमचे आधीच खाते आहे
Slack कडे तुमचा जो ईमेल पत्ता आहे, त्याने आधीच एक खाते आहे. नेहमीप्रमाणे त्या खात्यात लॉग इन करा, आणि मग Slack जोडण्यासाठी पुन्हा “Slack वर पाठवा” दाबा.
गोपनीयता
Tjaz काय जतन करते आणि ते कसे हटवून घ्यावे, हे अटींमध्ये “Slack मध्ये Tjaz” या भागात दिले आहे.